आसरडोहकार पुरस्कार वितरण सोहळ्याला शामसुंदर सोन्नर, अमर हबीब, डॉ. बिराजदारांची उपस्थिती
पत्रकार बाबा देशमाने◼️अंबाजोगाई येथील कै त्र्यंबक आसरडोहकर प्रतिष्ठानचा मानाचा पुरस्कार बाबा देशमाने यांना २० जानेवारी रोजी होणार प्रदान
अंबाजोगाई | प्रतिनिधी ✍️
जेष्ठ पत्रकार, ह. भ. प. शामसुंदर महाराज सोन्नर यांच्या हस्ते दिल्या जाणाऱ्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार तथा किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब राहणार आहेत. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिसन विभाग प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दि.२० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता, पत्रकार भवन, नगर परिषद जवळ, आंबाजोगाई येथे होणाऱ्या कार्यक्रमाला नागरिक व पत्रकारांनी उपस्थित रहावे असे आवाहन ता प्रतिष्ठानच्या अध्यक्ष किरण आसरडोहकर यांनी केले आहे.
या पुरस्काराचे मानकरी बाबा देशमाने हे मूळचे दिंदुडचे आहेत. त्यांनी गोवा राज्यात जाऊन एक तप पत्रकारिता केली. सद्या ते ‘आरोग्यदूत’ या अंकाचे संपादक म्हणून कार्यरत आहेत. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृती चिन्ह, शाल, श्रीफळ असे आहे.
यापूर्वी हा पुरस्कार सय्यद दाऊद, श्रावण कुमार जाधव, दत्ता देशमुख, अभिजित (बाळासाहेब) गाठाळ, कलीम अजीम, गोविंद शेळके, अतुल कुलकर्णी, संदिप सोनवळकर, विद्या गावंडे, शुभम खाडे या मान्यवरांना देण्यात आला आहे.
आपल्या मातीचा सुगंध देणारा हा पुरस्कार आहे. तरी सर्व नागरिक तथा पत्रकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा किरण आसरडोहकर यांनी केले आहे.
- महाराष्ट्रातील मराठ्यांनी पायी मोर्चात सहभागी व्हावे — मनोज जरांगे पाटील
- बीड शहरात बुधवारी वरिष्ठ खुला वयोगटातील क्रिकेट निवड चाचणी