परशुराम आर्थिक विकास महामंडळ पूर्ण समाजाचे यश आहे – दिपकभाऊ रणनवरे
केज | प्रतिनिधी ✍️
◼️महामंडळाची प्रक्रिया लवकरच पुर्ण होईल – मकरंद कुलकर्णी
समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात जनसंपर्क अभ्यास दौऱ्याची सुरूवात केज येथून करण्यात आली. यावेळी बोलताना दिपक रणनवरे म्हणाले की, जे काही ब्राह्मण समाजासाठी सरकार करणार आहे हे सर्व महाराष्ट्रातील समाज बांधवांचे आहे तर परशुराम आर्थिक विकास महामंडळाची प्रक्रिया लवकरच पुर्ण होईल असे मकरंद कुलकर्णी म्हणाले यावेळी संघर्ष समितीच्या वतीने समाजाच्या कुटुंब नोंदणीचा फॉर्मचे विमोचन करण्यात आले.
दि.१३ जानेवारी रोजी येथील बालाजी मंदिर येथून समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचा जनसंपर्क अभ्यास दौऱ्याची सुरूवात करण्यात आली. यावेळी समाजासठी उपोषण करणारे दिपक रणनवरे, कोल्हापूर येथील मकरंद कुलकर्णी, अशोक वाघ जळगाव, ॲड.राजेंद्र पोतदार वसमत,श्रीकांत जोशी अकोला, ईश्वर दिक्षीत बुलढाणा, प्रशांत देशपांडे, दिगंबर जोशी वडवणी, चिन्मय कुलकर्णी कळंब आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रास्तविकपर भाषणामध्ये या जनसंपर्क अभ्यास दौरा कश्यासाठी आहे ? व संघर्ष समितीने आतापर्यत काय केले ? तसेच विधान भवन नागपूर येथील बैठकीची माहिती समाज बांधवाना दिली. यावेळी बोलताना दिपक रणनवरे यांनी सांगितले की मी समाजाच्या भावी पिढ्या साठी शैक्षणिक व व्यावसायीक भुक भागविण्यासाठी व सरकार कडून सहकार्य पाहिजे म्हणून समाजाच्या वतीने मी फक्त प्रातिनिधीक स्वरुपात होतो.मुख्यमंत्री महोदयानी घोषणा केली व लवकरच महामंडळ होणार असल्या मुळे हे यश संपूर्ण ब्राह्मण समाजाचे असल्याचे म्हणाले. मकरंद कुलकर्णी यांनी मंत्रालयीनकामकाज बाबतीत माहिती दिली व परशुराम आर्थिक विकास महामंडळाची प्रक्रिया ही लवकरच पुर्ण होणार असुन समाजातील गरजु बांधवांना याचा उपयोग होईल यासाठी समाजाने प्रयत्न करावा लागेल असे म्हणाले. याप्रसंगी समस्त ब्राह्मण संघर्ष समितीच्या वतीने समाजाच्या समस्या व कुटुंबाची सामाजिक, आर्थिक शैक्षणिक माहिती संकलित करण्यासाठी कुटुंबाची माहितीचा फॉर्म चे विमोचन करून संपूर्ण महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाची नोंदणी करून केज येथे सगळी माहिती जमा करून अहवाल तयार केला जाईल. यासाठी केज येथे सगळे फॉर्म पाठवावेत असे सांगितले. यावेळी श्रीनिवास केजकर, श्रीधर खोत, समीर देशपांडे, सचीन देशपांडे, चंद्रकांत पाटील, शिवराज मुथळे, प्रविण देशपांडे, उदय कुलकर्णी, अनंत कोकीळ, सौ.धनश्री कुलकर्णी,सौ. विजयाकेजकर, सौ.ज्योती पाटील, कु.स्नेहल पाटील, कु.अमृता कुलकर्णी, दिपक देशपांडे, भगवानराव केजकर यांच्यासह केज तालुक्यातील ब्राह्मण बंधु भगिनी उपस्थित होते. सुत्रसंचलन शिवराज मुथळे यांनी केले तर आभार दिपक देशपांडे यांनी मानले. यावेळी बहुसंख्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.जनसंपर्क अभियान यशस्वी होण्यासाठी यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.