श्री छञपती राजर्षी शाहु बँकेच्या केज शाखेचा २६ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा


केज | प्रतिनिधी ✍️


       केज येथील श्री छञपती राजर्षी शाहु को-आॕप बँक लि.बीड शाखेचा २६ वा वर्धापन दिन शनिवार दि.२० जानेवारी २०२४ रोजी उत्साहात संपन्न झाला.या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष इंजी. अजय पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे बँकेचे उपाध्यक्ष नारायणराव मस्के, बँकेचे स्थानिक सल्लागार रामचंद्र आनेराव, राहुल देशमुख, प्रा.हनुमंत भोसले आदी मान्यवर उपस्थीत होते.

सर्वप्रथम छञपती राजर्षी शाहु महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर बँकेचे संस्थापक अध्यक्ष कै.अर्जुनराव जाहेर पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगवानराव पवार यांनी केले. यावेळी बँकेच्या प्रगतीचा आढावा त्यांनी सांगितला. बँकेचे उपाध्यक्ष नारायणराव मस्के यांनी बँकेच्या व्यवहाराबाबत समाधान व्यक्त करत ग्राहक, ठेवीदार व कर्मचारी वर्गाचे कौतुक केले. आपल्या अध्यक्षीय समारोपामध्ये बँकेचे अध्यक्ष इंजी.अजय पाटील यांनी सांगितले की, आपल्या बँकेच्या ४६ शाखा कार्यरत असुन बँकेचा स्वतंत्र आयएफ एससी कोड आहे. काही अपरीहार्य कारणासाठी इंटरनेटवर चालणाऱ्या बँकाना व्यवहार करण्या साठी अडचणी येत असताना आपल्या बँकेची स्वतंत्र लीज लाईन असल्या मुळे सुरुळीत व्यवहार करता येतो. ग्राहकांनी आपला सिबील स्कोअर चांगला ठेऊन कर्जाची वेळेवर परतफेड करावी. चांगल्या ग्राहकांच्या पाठीशी बँक सदैव पाठीशी राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. आभार प्रदर्शन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगवानराव पवार यांनी मानले. यावेळी ग्राहक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थीत होते. कर्मचारी वर्गाने वर्धापनदिन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!