नेकनुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे जोरात : पोलिस प्रशासनाचे अर्थपुर्ण दुर्लक्ष ?
बीड | प्रतिनिधी ✍️
बीड तालुक्यातील नेकनुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुलेआमपणे अवैध धंदे सुरू असुन राजरोजपणे नॕशनल हायवे वरच्या हॉटेलवर देशी, विदेशी, बनावट दारू विक्री केली जात आहे. तसेच बालाघाटावरील रोडवरील काही केंद्रावर वेश्या व्यवसाय होत असल्याची चर्चा होत आहे.
बालाघाटावर अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. चौसाळा शहरात बसस्थानक परिसरातच अवैध दारू विक्री होत असुन याचा त्रास बसस्थानकामधील प्रवासी वर्गाला होत आहे. जागो-जागी गुटखा खुलेआमपणे विक्री होत असल्याची माहीती मिळत आहे. नेकनुर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यानी डोके वर काढले असुन नेकनुर पोलीस स्टेशनचे अधिकारी याकडे अर्थपुर्ण दुर्लक्ष तर करत नाहीत ना ? जिल्हा पोलीस अधीक्षक या सर्व गोष्टीकडे लक्ष घालणार का? असे प्रश्न सर्वसामान्यातुन चर्चिले जाऊ लागले आहेत.