खासदारांनाच राडी गावात मराठा समाजाचा विरोध ?
बीड | प्रतिनिधी ✍️
🔸 पोलीसांनी केले आंदोलकांना शांत
बीड लोकसभेच्या विद्यमान खासदार डॉ प्रीतमताई मुंडे यांना तिकीट भाजपाने नाकारत पंकजाताई मुंडे यांना यावेळी बीड लोकसभेची उमेदवारी दिल्यामुळे पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारात राडी या गावात बैठक घेण्यासाठी खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे काल (दि.०२एप्रिल) रात्री गेल्या असता मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणा देत “चले जाओ चले जाव मराठा विरोधी चले जाओ” अशा घोषणा दिल्यामुळे वाद नको म्हणून खासदार प्रीतम ताई मुंडे यांना बैठक न घेता राडी गावातून परतावे लागल्याची घटना काल रात्री घडली.
यापूर्वी केज तालुक्यातील पावनधाम येथे भाजपाच्या उमेदवार पंकजाताई मुंडे दर्शनाला गेल्या असता त्या ठिकाणीही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी सौम्य लाठीमार करत आंदोलकांना पांगवले होते. काल जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे अंबाजोगाई तालुक्यातील राडी गावात पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारात बैठक घेण्यासाठी राडी गावात गेल्या असता मराठा आंदोलक जमा झाले त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केल्याने काही काळ वातावरण संतप्त झाले मराठा विरोधक चले जाव चले जाव… च्या घोषणा देण्यात आल्या ज्यांच्या घरी खासदार मुंडे गेल्या होत्या त्यांच्या नावेही आंदोलकांनी घोषणा देण्यास सुरुवात केल्याने अखेर बैठक न घेता खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे यांनी परत जाण्याचा निर्णय घेतला व त्या परतल्याही त्यावेळी पोलीस हजर असल्याने पोलिसांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलक डॉ मुंडे राडी गावातून बाहेर निघेपर्यंत जोर-जोरात घोषणा देत होते.
भाजपाने पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी जाहीर केल्याने त्या प्रचाराला लागल्या आहेत मात्र महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने दोन नावे उमेदवारीच्या चर्चेत आहेत बजरंग सोनवणे, ज्योतीताई मेटे कोणाला उमेदवारी मिळणार आज दुपारी जाहीर होईल. त्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सुद्धा मराठा आंदोलकाचा अशाच विरोधाचा सामना करावा लागतो की त्यांचे स्वागत होते हे येणाऱ्या काळात समजेल.