मुलीचा उपचाराअभावी मृत्यू : पित्याने संपवले जीवन


छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी ✍️


कुठलेही कारण न देता मुख्याधिकाऱ्यांनी तडकाफडकी निलंबित केले. त्‍यामुळे आर्थिक कोंडी झालेल्या सोयगाव नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्याला आपल्या आजारी लेकीवर आवश्यक उपचारही करता आले नाही. उपचाराअभावी १९ वर्षीय तरुणीचा मृत्‍यू झाला. त्‍यामुळे या पित्‍याला धक्का बसला.

आपण आपल्या आजारी लेकीवर वाचवू शकलो नाही याची खंत वाटून नैराश्यात गेलेल्या ४५ वर्षीय दीपक प्रल्हाद राऊत यांनी राहत्‍या घरात मध्यरात्री गळफास घेतला. ही दुर्दैवी घटना सोयगावची आहे. ही घटना सोमवारी (८ एप्रिल) समोर आल्यानंतर राऊत यांच्या संतप्त नातेवाइकांनी मृतदेह नगरपंचायतीत आणला आणि तिथेच ठिय्या दिला. त्‍यामुळे भंबेरी उडालेल्या प्रशासनाने तातडीने हालचाली करत नगरपंचायत मुख्याधिकारी बबन तडवी याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईचे आणि राऊत यांच्या पत्‍नीला अनुकंपा तत्‍वावर शासकीय सेवेत घेण्याचे आश्वासन लेखी दिले. त्‍यानंतर सोना नदी स्मशानभूमीत दुपारी अंत्‍यसंस्कार करण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!