येवता येथील दलित समाज बांधवांचे पिण्याच्या पाण्यासाठी पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात धरणे आंदोलन
🔸सहाय्यक गट विकास अधिकारी राठोड यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे
केज : तालुक्यातील येवता येथील दलित बांधवांनी पिण्याच्या पाण्या साठी पंचायत समिती केज येथे धरणे आंदोलन याबाबतची सविस्तर माहिती अशी की गेल्या दीड महिन्यापासून येवता येथील दलितबांधवांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. ग्रामविकास आधिकारी यांना सांगून पण आमच्या पिण्याच्या पाण्याची सोय होत नव्हती म्हणून आम्ही आज पंचायत समितीच्या दारात धरणे आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये रिपब्लिकन पार्टीचे तालुका अध्यक्ष दीपक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केले होते. या मध्ये गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी गट विकास सहाय्यक अधिकारी राठोड साहेब यांनी आंदोलनकर्त्यांना टँकरचे आश्वासन दिल्या नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.