जालना : लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांचा दणदणीत विजय झाला आसून भोकरदन तालुक्यातील तडेगाव येथील गावकऱ्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कट्टर समर्थक सलीम शेख, कौसर शेख, शेरु शेख रतन साळवे, मनवर पठाण, अखिल शेख, शाकीर शेख, पत्रकार शरद साळवे इत्यादी उपस्थित होते.