शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखांच्या पोलीस कोठडीत वाढ
बीड : शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी खांडे सध्या पोलीसांच्या ताब्यात आहेत. बीड न्यायालयाने तसे आदेश दिले आहेत.
शिंदे गटाचे माजी बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेला ३०७ च्या गुन्ह्यात अटक झाली होती. आज बीड खांडेला न्यायालयात हजर केले असता खांडेच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ झालीय. पोलिसांनी खांडेसाठी पाच दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मागील आठवड्यात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या बाबत कथित ऑडिओ क्लिप वायरल झाली होती. आणि त्यानंतर कुंडलिक खांडे चर्चेत आले होते. या ऑडिओ क्लिप नंतर एप्रिल महिन्यात दाखल झालेल्या ३०७ च्या गुन्ह्यात कुंडलिक खांडेला पोलिसांनी अटक केली मागील चार दिवसांपासून कुंडलिक खांडे हा पोलिसांच्या ताब्यात आहे. आता आणखी खांडे यांच्या अडचणीत वाढ झालीय. या गुन्ह्यानंतर शिंदे गटाकडून कुंडलिक खांडे याची हकालपट्टी देखील करण्यात आलेली आहे.
पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका
कुंडलिक खांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण बीड जिल्ह्यात उमटल्याचं पाहायला मिळालं. मागच्या दोन दिवसापासून व्हायरल होत असलेल्या कथेत ऑडिओ प्रकरणामुळे चर्चेत आलेले बीडचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर हकालपट्टी ची कारवाई करण्यात आली आहे.