लातूर जिल्हा पोलीस शिपाई पदासाठी गुणवत्ता यादीतील उमेदवारांची लेखी परीक्षा
लातूर : जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस भरती प्रक्रियेतील शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया ही दि. १९ जून ते २८ जून या कालावधीत पोलीस मुख्यालय बाबळगाव लातूर या ठिकाणी घेण्यात आली आहे.
पोलीस शिपाई पदासाठी च्या शारीरिक मोजमाप व शारीरिक मैदानी चाचणी परीक्षेत उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या ०१ जागेसाठी १० उमेदवार प्रमाणातील उमेदवारांचे गुणांची तात्पुरती गुणवत्ता यादी दि. २९ जून रोजी पोलीस अधीक्षक लातूर कार्यालयाचे संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथील दर्शनी भागावर चिटकविण्यातआली आहे.
पोलीस शिपाई पदासाठी सदर गुणवत्ता यादीतील उमेदवारांची लेखी परीक्षा ही दि. ०७ जुलै रोजी सकाळी ०९.०० वाजता पोलीस प्रशिक्षण केंद्र बाभळगाव लातूर या ठिकाणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी दिनांक ०७ जुलै रोजी सकाळी ०६.०० वाजता पोलीस प्रशिक्षण केंद्र बाभळगाव लातूर या ठिकाणी वेळेत हजर राहायचे आहे. सकाळी ०७.०० वाजता नंतर उशिराने येणारे उमेदवारांना लेखी चाचणीसाठी प्रवेश दिला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
उमेदवारांनी लेखी चाचणीसाठी येताना स्वतःचे प्रवेश पत्र (हॉल तिकीट) सोबत घेऊन यावे, ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी सोबत घेऊन यावे. पासपोर्ट साईज ०४ फोटो सोबत घेऊन यावेत. उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य, मोबाईल फोन, बॅग, किमती वस्तू घेऊन येण्यास बंदी राहील. सदरची लेखी चाचणी प्रक्रिया ही सीसीटीव्ही व व्हिडिओग्राफीच्या निगराणीखाली अतिशय तटस्थपणे निष्पक्षपणे व पारदर्शक रित्या घेण्यात येत असून उमेदवारांनी कोणत्याही अमिषास व भूलथापांना बळी पडू नये. कोणाकडून असे आश्वासन देण्यात येत असल्यास सदरची बाब पोलीस अधीक्षक लातूर तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर यांना तात्काळ अवगत करण्यात यावे असे लातूर पोलीस दलामार्फत आव्हान करण्यात येत आहे.