जालना : जाफ्राबाद विधानसभा मतदार संघातील मातंग मुक्ती सेनेचे जिल्हा अध्यक्ष विष्णू गोफने यांची विधानसभा निवडणूक लडवणार असल्याची चर्चा मतदारसंघामध्ये जोर धरु लागली आहे. भोकरदन जाफ्राबाद मतदार संघातील विकास कामे न झाल्यामुळे जनतेच्या हितासाठी मी निवडणूक लडवनार असे गोफने यांनी म्हटले आहे. त्यांचा भोकरदन जाफ्राबाद मतदार संघात चांगला प्रभाव आहे. अनेक सामाजिक आंदोलने त्यानी मागील काही काळात केलेले आहे. तरी गोफने म्हणाले आहे की समाजातील सर्व संघटनेशी चर्चा करून सर्वानुमते जर माझी निवड केली तर मी भोकरदन जाफ्राबाद विधानसभा निवनुक लडवीन असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.