चौसाळा शहरात घाणीचे साम्राज्य : नागरिकांचे आरोग्य धोक्यात
जागोजागी कचरा, घंटागाडी फक्त नावालाच ?
चौसाळा : सोलापूर – धुळे महामार्गावर मोठी लोकसंख्या असणारे शहर म्हणजे चौसाळा शहर होय. या ठिकाणी मोठी लोकसंख्या वास्तव्यास आसुन हायवेलगत असणाऱ्या या गावात रोज जवळपासच्या किमान ३० गाव-खेडयांचे नागरिक कामानिमित्त या ठिकाणी येतात. चौसाळा शहरात दर बुधवारी आठवडयाचा मोठा बाजार भरतो आणी या बाजारासाठी येथे प्रचंड गर्दी झालेली असते.
चौसाळा शहर हे मोठी बाजारपेठ जरी असली तरी मात्र या ठिकाणच्या नागरिकांचे आरोग्य सतत धोक्यात आलेले दिसते आणी याला कारण आहे ते म्हणजे या ठिकाणी जागोजागी साचलेले कचर्याचे ढिगारे, घाण,सांडपाणी आणी कचरा. यामुळे ईथल्या नागरिकांना डेंगु, मलेरिया, थंडी, तापेच्या साथीच्या छायेखाली सतत जगावे लागते. मुळात या ठिकाणी २०२२ सालीच घण कचरा व्यवस्थापन निधीतून ५४ लक्ष रुपये मंजुरीचे काम सुरू करण्यात आले होते. चौसाळा शहरातील नागरिकांची हि महत्वाची समस्या आ.संदीप भैय्या क्षीरसागरांनी तात्काळ लक्षात घेऊन यासाठी घण कचरा व्यवस्थापन निधीची मंजुरी मिळवुन घेतली होती. मात्र चौसाळा शहरातील जुन्या प्रस्थापित नेत्यांनी या योजनेच्या कामात या ना त्या कारणाने सुरुवाती पासुनच खोडा घालावयाला सुरुवात केल्यामुळे चौसाळा ग्रामपंचायतीला स्वच्छतेची ही मोहीम राबवण्यासाठी अनंत अडचणी येऊ लागल्या. आपल्या वैयक्तिक राजकीय आकसापोटी जनकल्याणाच्या कामात खोडा आणुन अडवणुक करत येथील जुना नेत्यांनी हे काम जवळपास बंद पाडले. परिणामी आज चौसाळा शहरात जागोजागी कचर्याचे ढिग, कचर्यांचे मोठं मोठे ठेल, जिकडेतिकडे घाण, दुर्गंधी, मच्छर, घुशी,उंदीर , माशा पसरल्यामुळे डेंगु, मलेरिया, थंडी, तापीसह ईतर साथीच्या आजारांनी चौसाळा शहरात थैमान घातल्याचे चित्र सध्या चौसाळा परिसरात बघावयाला मिळत आहे. चौसाळा ग्रामपंचायती मध्ये घंटागाडया असुन त्या फक्त नावालाच आहेत. कारण या गाडयांमधुन कचरा संकलन जरी केला तरी त्या संकलीत केलेल्या कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचरा डेपो कुठे करायचा ? आणी आधी ज्या जागी कचरा डेपो सुरू केला होता तिथे सुरुवातीलाच विरोधक प्रस्थापित नेत्यांनी कचरा डेपोसाठी आडकाठी आणल्यामुळे चौसाळा ग्रामपंचायतला कचर्यासाठी डेपो कुठे करावा आणी या कचर्याची कशी विल्हेवाट लावावी या बाबत चिंता आहे. परिणामी कचर्याचे संकलन बंद आहे आणी ग्रामपंचायत चौसाळयाच्या घंटागाडया धुळखात पडुन आहेत. आपल्या स्वार्थी हेतूसाठी चौसाळा येथील काही प्रस्थापित जुन्या नेतेमंडळीच्या आडमुठया धोरणामुळे मात्र चौसाळा येथील नागरिकांचे आरोग्य सध्या प्रचंड धोक्यात आलेले आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांनी जरी चौसाळा परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत घण कचरा व्यवस्थापनेतुन या कामाला मंजुरी देउन ५४ लाख रुपयांचा निधी मंजुर करुन जरी घेतला असला तरी,जुन्या प्रस्थापित नेत्यांनी आपल्या स्वार्थापोटी घेतलेल्या आडमुठया धोरणांमुळे हा निधी मिळाला नाही. आणी परिणामी 2022 पासून आजतागायत म्हणजे दोन वर्षापासून चौसाळा शहरातील जनसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणण्याचे पाप चौसाळयातील जुन्या प्रस्थापित नेत्यांनी केल्याची चर्चा सध्या चौसाळा परिसरासह संपूर्ण जिल्हयात चर्चीले जात आहे.जनकल्याणाच्या कामात जर प्रस्थापित समजल्या जाणाऱ्या जुन्या नेत्यांनीच आडकाठी आणुन काम बंद पाडायचे आणी लोकसेवेसाठी काम करणाऱ्यांच्या नावाने बोंबा ठोकायच्या अशी पध्दत सध्या चौसाळा भागात पहावयाला मिळत आहे. आपल्या स्वार्थापायी जनतेला वेठीस धरुन त्यांच्या आरोग्याशी खेळ खेळण्याचे महापाप हे जुने प्रस्थापित नेते करत आहेत अशी संतापजनक चर्चा सध्या चौसाळा परीसरात सुरु आहे.