सुमेध बप्पा शिंदे यांना शोकाकूल वातावरणामध्ये अखेरचा निरोप
केज : केज शहरामध्ये अत्यंत कमी वयात आसंख्य मित्र परिवार गोळा करत सदैव कष्टकरी आणि वंचितांच्या बाजूने भुमिका मांडणारा आणि सर्वांच्या लाडक्या बप्पाला आज (दि.२ आॉक्टोबर) अखेरचा निरोप देताना उपस्थित जनसमुदाय भावुक झाला होता.
स्वतःच्या कर्तुत्वाने आपले सामाजिक आणि राजकीय अस्तित्व निर्माण करत असताना कधीही कोणाला आपल्यापासून त्रास होणार नाही अशी वर्तणूक त्यांची होती. वार्ड क्रमांक नऊ मध्ये आई नगरसेविका म्हणून निवडून आली तरीही सत्तेत असताना नेहमीच वंचित आणि गरजू लोकांच्या मदतीला धावून जाण्यासाठी तत्पर असलेले सुमेध शिंदे यांना दि. ०१ ऑक्टोबर रोजी अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना अंबेजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांना सुमेध बप्पा शिंदे यांना वाचवण्यात अपयश आले, यातच त्यांचा मृत्यू झाला. आज (दि०२ ऑक्टोबर) रोजी त्यांच्या पार्थिव देहावर येथील सार्वजनिक स्मशानभुमी येथे अंत्यविधी करण्यात आला. यावेळी शहरातील नव्हे तर तालुक्यातील राजकीय, सामाजिक, उद्योगपती, पत्रकार तसेच मित्र, नातेवाईक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत होतकरु उमदा तरुण गेल्याने केज शहरावर शोककळा पसरली आहे.