केज विधानसभा मतदार संघातून दोन डजनपेक्षा जास्त उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात
लोकसाथी न्यूज | दिनकर जाधव
केज विधानसभा मतदारसंघ 1978 पासून अनुसूचित जाती (एस.सी.) या प्रवर्गासाठी राखीव आहे. दि. 20 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील निवडणुकी चे मतदान होत आहे. यामध्ये केज मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असून यावर्षी दोन डजनपेक्षा अधिक उमेदवारांनी आपले नशीब आजमावण्याचे ठरवले आहे.
या वर्षी केज विधानसभा मतदारसंघातून एकूण 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दि.04 नोव्हेंबर नामनिर्देशन माघारी घेण्याची शेवटची तारीख अखेर 25 उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवली यामध्ये अनंत वैजेनाथ गायकवाड (बसपा) , नमिता अक्षय मुंदडा (भाजपा) , पृथ्वीराज शिवाजी साठे (रा.कॉ.शरद पवार पक्ष), रमेश रघुनाथ गालफाडे (मनसे) , अलका प्रभाकर साळुंके (टिपू सुलतान पार्टी) , अशोक धोंडिबा सोनवणे (भारतीय युवा जन एकता पार्टी) , गणेश भागुजी थोरात (बहुजन महापार्टी) , अशोक लक्ष्मण इचके (राष्ट्रीय मराठा पार्टी) , जीवन श्रीपती गायकवाड (महाराष्ट्र स्वराज्य पार्टी) , शितल महादेव रोकडे (राष्ट्रीय समाज पक्ष) , साहस पंढरीनाथ आदोडे (मराठवाडा मुक्ती मोर्चा) , आशिष अशोक भालेराव (अपक्ष) , जयश्री गोरख वाघमारे (अपक्ष) , महावीर धर्मराज सोनवणे (अपक्ष) , मिलिंद दगडू आचार्य (अपक्ष) , लहू महादेव बनसोडे (अपक्ष) , विजयकुमार सुखदेव वाव्हळ (अपक्ष) , विशाल घनश्याम घोबाळे (अपक्ष) , वैभव विवेक स्वामी (अपक्ष) , शिषिर मिलिंदराव कांबळे (अपक्ष) , सचिन भिमाराव चव्हाण (अपक्ष) , सतिश सुदाम पायाळ (अपक्ष) , संजय पंढरीनाथ साळवे (अपक्ष) , संजय बाबुराव होळकर (अपक्ष) ,स्वप्निल बाब्रुवान ओव्हाळ (अपक्ष) हे उमेदवार या पंचवार्षिक साठी आपले नशीब आजमावत आहे.
आतपर्यंत केज मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले लोकप्रतिनिधी
1962 गोविंदराव गायकवाड
1967 सुंदरराव सोळंके
1972 बाबुराव आडसकर
1978 भागुजी निवृत्ती सातपुते
1980 गंगाधर निळकंठ स्वामी
1985 भागुजी निवृत्ती सातपुते
1990 विमलताई मुंदडा
1995 विमलताई मुंदडा
1999 विमलताई मुंदडा
2004 विमलताई मुंदडा
2009 विमलताई मुंदडा
2012 पृथ्वीराज साठे
2014 संगीता ठोंबरे
2019 नमिता मुंदडा