श्रीराज काळकुटे याची शालेय बेसबॉल खेळामध्ये राज्यस्तरीय निवड
बीड | लोकसाथी न्यूज
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय (पुणे) तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय विभागीय बेसबॉल स्पर्धा 14 वर्ष मुले/मुली दि. 30 आॕक्टोबर रोजी सेलू (परभणी) येथील नूतन विद्यालय येथे स्पर्धा व निवड चाचणी पार पडली.
या निवड चाचणीमध्ये गुरुकुल पब्लिक स्कूल चे दोन खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या चाचणी मध्ये श्रीराज संजय काळकुटे याने नेत्रदिप कामगिरी करत त्याची शालेय राज्य स्तरीय निवड चाचणी साठी निवड करण्यात आली. राज्य स्तर स्पर्धा व निवड चाचणी नांदेड येथे दि. 7,8 व 9 या तारखेस होणार आहे व याच ठिकाणी शालेय राष्ट्रीय स्पर्धसाठी साठी महाराष्ट्राचा संघ निवडणार आहेत.
या निवडीबद्दल बेसबॉल प्रशिक्षक किशोर काळे सर (राष्ट्रीय खेळाडू) यांचे श्रीराज काळकुटे यास मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच शाळेच्या क्रीडा शिक्षिका काशीद मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर सर, बेसबॉल जिल्हाध्यक्ष दिनकर थोरात सर, बेसबॉल राज्य क्रीडा मार्गदर्शक रेवनाथ शेलार सर, शाळेच्या प्राचार्या ऋतुजा गाढवीन मॅडम यांनी श्रीराज काळकुटे व प्रशिक्षक किशोर काळे सर व क्रीडा शिक्षिका काशीद मॅडम यांचे कौतुक व अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.