आनंदगाव येथे खंडोबा यात्रेची जय्यत तयारी
यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
केज ! प्रतिनिधी ✍️
केज तालुक्यातील आनंदगावचे ग्रामदैवत महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान खंडोबा यात्रेस आज रविवार दि १७(डिसेंबर) पासून प्रारंभ होत आहे. ग्रामस्थांनी विविध कार्यक्रमांसाठी जय्यत तयारी केली गावात ग्रामस्वच्छता रस्ते साफसफाई करून यात्रेकरूंच्या स्वागताची तयारी केली आहे.
भाविकांचे “येळकोट येळकोट जय मल्हार” घोष दुमदुमु लागले आहेत.
केज तालुक्यातील आनंदगाव(सा) येथे यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि १७ रोजी रात्री पालखीची छबिना मिरवणूक. रात्री १० :३० त्यांनतर जय मल्हार वाघ्या मुरळी पार्टी कार्यक्रम,सोमवार रोजी दुपारी बारा गाडया ओढणे ,यात्रेकरूंना महाप्रसाद व गोंधळी कार्यक्रम, रात्री ८ वाजता खंडेश्वर नाट्य मंडळ आयोजित मिळवाय गादी भानगड साधी अर्थात खेळ खुर्चीचा हे नाटक होईल,मंगळवार रोजी पहाटे लंगर तोडणे ,दुपारी जंगी कुसत्याचा फड गजबजनार कुस्तीसाठी प्रथम पारितोषिक 11000 रुपये रोख रक्कम व पाच भार चांदीचे कडे, द्वितीय पारितोषिक 7000 रुपये ,तृतीय पारितोषिक पाच हजार रुपये देण्यात येणार आहे. पैलवानांनी कुस्तीची नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
रात्री ८ वाजता ईश्वर बापू पिंपरीकर लोकनाट्य तमाशा मंडळ बारामती यांचा तमाशा कार्यक्रम होईल. बुधवार रोजी सकाळी रक्तदान शिबिर , रांगोळी व चित्र रंगभरण स्पर्धा होतील. रात्री ८ वाजता ईश्वर बापू पिंपरीकर लोकनाट्य तमाशा मंडळ बारामती यांचा तमाशा कार्यक्रम होईल गुरुवार रोजी सकाळी भव्य पशुप्रदर्शन व आरोग्य शिबीर होईल. सांयकाळी पालखीची छबिना मिरवणूक होईल .यात्रेनिमित्त व्यापारी, दुकानदार आदींसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे यात्रेकरूनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आनंदगावकरांच्या वतीने करण्यात आले आहे.