रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा यासह ईतर मागण्यांसाठी संपादक अजय भांगे यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरु
सामाजिक प्रश्नांसाठी आणि समाजहितासाठी अखेर लेखणी आमरण उपोषणाला
केज येथे सुरु असलेल्या बेमुदत आमरण उपोषणाला केजच्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा जाहीर पाठिंबा
केज ! प्रतिनिधी ✍️
बालाघाटावरचे मांजरसुबा ते धायगुडा पिंपळा या राष्ट्रीय महामार्गाचे मजबुतीकरण करण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने सिमेंट काँक्रिट करून रस्त्याचे मजबुती करणाचे काम HPM कंपनीला देण्यात आले. या रस्त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी तथा देखरेख करण्यासाठी NPEC कंपनीव्दारे रवि कुमार यांची नेमणुक करण्यात आली. HPM कंपनी हि पाठीमागील ३ वर्षापासुन अतिशय संथ गतीने काम करत आहे .
तसेच रस्ता सुरु करण्या अगोदरच सदरील रस्त्याच्या कामांमध्ये स्टीलचा वापर न केल्यामुळे रस्त्याला कोरेगाव , चंदनसावरगाव , डिघोळअंबा, केज, पाण्याच्या टाकीसमोर , आमदार निवासाच्या समोर अंबाजोगाई , घाटनांदूर ,धायगुडा पिंपळासह आदि. ठिकाणी जागोजागी तडे, भेगा, चिरा जाऊन रस्ता खचल्यामुळे मोठ्या प्रमाणात आपघात होऊन कित्येकांना आपला जिव गमवावा लागला आहे. त्या बरोबरच रस्ता करण्या अगोदर रस्त्याच्या कडेला असंख्य झाडांची कत्तल करण्यात आली होती. परंतु आद्यापपर्यंत एकही रोपटे रोडच्या कडेला लावण्यात आलेले नाही. तसेच रस्त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी नेमण्यात आलेले रवि कुमार यांच्या ढिसाळ कारभारामुळे रस्त्यालगत असलेल्या गावांकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीने झाले असुन यामुळे राष्ट्रीय महामार्गावर तथा गावांकडे जाणाऱ्या निकृष्ट रस्त्यामुळे भविष्यात आपघात होऊन जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सदरील रस्त्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून तो यापुढेही सुरुच आहे. विशेष म्हणजे रस्त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी ज्या NPEC कंपनीचे रवि कुमार यांची नेमणुक केली होती. रवि कुमार अंबाजोगाई येथील ४ महिन्यापुर्वीच ऑफीस बंद करून फरार झाले आहेत . सदरील रस्त्याची गुणवत्ता न तपासताच HPM कंपनीचे गुप्तेदार देवळे भष्टाचार युक्त राष्ट्रिय महामार्गाचे काम संथ गतीने करत आहेत. होत असलेल्या या कामाचे करोडो रुपयांची बिले काढले जात आहेत. त्यामध्ये औरंगाबाद येथील कांही कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन बिले काढली जात आहेत. तसेच NPEC चे ऑफीस ४ महिन्यापासुनी बंद आहे. तर मग रस्त्याची गुणवत्ता न तपासताच करोडो रुपयांची बिले कोण काढत आहे ? जर एकही कर्मचारी तेथे हाजर नाही. तर त्यांची लाखो रुपयांची पगार बीले कसे निघतात ? यावर महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ मुंबई, औरंगाबाद यांनी NPEC कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड. ची व मुख्याधिकारी रवि कुमार ,HPM कंपनीचे गुत्तेदार देवळे यांची तात्काळ विभागीय चौकशी करावी. NPEC कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड हि कंपनी महाराष्ट्रामध्ये ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावी. जे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ औरंगाबाद येथील कर्मचारी यामध्ये सामील आहेत. मी याबाबत मागील कित्येक दिवसापासुन प्रशासनाच्या लक्षात आणुन देऊन पाठपुरावा करत आहे. मात्र संबधितावर कसल्याच प्रकारे कारवाई होत नाही. वरिल बाबीची आपण तात्काळ दखल घ्यावी. व संबधीतावर कठोर कायदेशीर कारवाई करावी यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बीडचे जिल्हा अध्यक्ष तथा दै.वादळ वार्ताचे मुख्य संपादक मा.अजय भांगे यांनी दि. २० डिसें. पासून बुधवार रोजी केज तहसिलदार कार्यालया समोर सकाळी ११ वाजल्यापासुन बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला केज तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवानचा तसेच महिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पदाधिकारी जिल्हा सरचिटणीस मुबाशीर खतीब, केज तालुकाध्यक्ष रमेश गुळभिले , मुख्य प्रचार प्रमुख दशरथ चौरे, प्रचार प्रमुख प्रेमजीत हजारे , तालुका सहसचिव देवानंद खरात , विलास पोवळे यांनी जाहिर पाठींबा दिला असुन संपादक अजय भांगे यांच्या सोबत सर्व पत्रकार बांधव सोबत असल्याचे पत्रकारांच्या एकजुटीवर दिसुन आले.
जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत केज तहसील समोर सुरु केलेले आमरण उपोषण सुरुच राहाणार असल्याचे उपोषणकर्ते अजय भांगे यांनी सांगितले आहे.